Showing posts with label Harini. Show all posts
Showing posts with label Harini. Show all posts

Monday, July 12, 2010

Sakhya Re Lyrics

हा महाल कसला रानझाडी ही दाट
अंधार रातीचा कुठ दिसना वाट
कुन्या द्वाडाना घातला घाव
केली कशी ही करणी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी

काजळकाळी गर्द रात अन कंप कंप अंगात
सळसळणार्या पानांनाही रातकिड्यांची साथ
कुठ लपू मी, कशी लपू मी, गेले भाम्बावूनी
सख्या रे सख्या रे, सख्या रे घायाळ मी हरिणी १

गुपित उमटले चेहर्यावरती भाव आगळे डोळ्यात
पाश गुंतले नियती चे हे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठ पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवूनी
सख्या रे सख्या रे, सख्या रे घायाळ मी हरिणी २