A very inspiring poem by Kavi Mangesh Padgaonkar. I have remembered this poem at times when I felt sad.. sharing with you all..
चिउताई चिउताई दार उघड!
दार असं लावून जगावरती कावुन
किती वेळ डोळे मिटून आत बसशील
आपलं मन आपणंच खात बसशील
वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा
दार उघड!
फुलं जशी असतात तसे काटे ही असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटे ही असतात
गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात
कधी कधी कर्कशः काळे, कावळेच फक्त सगळे असतात
कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के ही बसतील
तरी सुद्धा ह्या जगात वावरावंच लागतं,
आपलं मन सावरावंच लागतं
दार उघड!
सगळचं कसं होणार आपल्या मनासारखं, आपलं सुद्धा आपल्याला होतं पारखं
मोर धुंद नाचतो म्हणून आपण का खिन्न व्ह्यायचं
कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का सुन्न व्ह्यायचं
तुलना करीत बसायचं नसतं गं, प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं
प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं
प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं
फुलणार्या त्या फुलासाठी, खेळणार्या त्या मुलासाठी
दार उघड!
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं
तुला शोधत फुलपाखरू नाचत आलं
चिउताई चिउताई, तुला काही कळलंच नाही
तुझं घरटं बंद होतं, डोळे असून अंध होतं
बंद घरात बसून कसं चालेल
जगावरती रुसून कसं चालेल
दार उघड!
Sunday, December 12, 2010
Subscribe to:
Posts (Atom)